मी नाही केले, माझ्या मेंदूने करायला लावले ! (माय ब्रेन मेड मि डू इट : एलाजर स्टर्नबर्गच्या पुस्तकाचा परिचय)
मानवी इतिहास म्हणजे माणूस व निसर्गातील चढाओढीची कथाच. माणसाने निसर्ग आजमावण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या चमत्कारांनी तो स्तिमित झाला आणि प्रश्न विचारू लागला. यांतल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळविताना आपण कितीतरी पुढे आलो आहोत, पण तरीही या प्रश्नांची लांबीरुंदी मात्र फारशी कमी झालेली नाही. काही बाबतीत तर आपण अश्या पायरीवर आलो आहोत, जिथे …